नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार ते हाटमोहीदा बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन दिले.त्यांच्या निवेदनाची दखल घेत तात्काळ बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले.
जूनमोहिदे व सिंदगव्हाण येथील इयत्ता बारावीच्या शालेय विद्यार्थीं यांना नंदुरबार येथे शाळेत जाण्या-येण्यासाठी हाटमोहिदे ते नंदुरबार मार्गांवरील सात ते आठ गावांमधील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती तसेच रिक्षा भाडे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही म्हणून बस आगार प्रमुखांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्याचे ठरविले.त्यानुसार विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना नंदुरबार ते हाटमोहीदा बस सेवा सुरु करण्याची मागणीचे निवेदन दिले.यावेळी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे बस आगार प्रमुख यांना फोन करून नंदुरबार ते हाटमोहीदा बस सेवा सुरु करण्यासाठी आदेश दिले.
विद्यार्थिनींची निवेदन पत्राची दखल घेत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यार्थिनी कल्याणी अशोक पाटील, जागृती चुनीलाल सोनवणे, पल्लवी रामचंद्र डांबरे उपस्थित होत्या.त्यांनी उपजिल्हाधिकारी यांचे आभार मानले. या विद्यार्थिनी कमला नेहरू कन्या विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज नंदुरबार येथे शिक्षण घेत आहेत.त्या जूनमोहिदे ,सिंदगव्हाण येथे राहणाऱ्या आहेत. शिक्षणासाठी असणारी त्यांची तळमळ मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी थेट उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.