नंदुरबार। प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे येथील रहिवासी तथा जळगाव जिल्ह्यातील कृषी सहाय्यक लोटन रडा मराठे यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी संजय पाटील होते. कृषी सहाय्यक लोटन मराठे यांनी नंदुरबार जिल्ह्यात सेवा बजावली असून गेल्या चार पूर्वी जळगाव जिल्ह्यात बदली झाली होती. त्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांचा जळगाव जिल्हा कृषी विभागातर्फे सहपत्नीक गौरव करण्यात आला आहे. कार्यक्रमाप्रसंगी कृषी अधिकारी डॉ.गावडे, डॉ.राजपूत, डॉ.वेडीज तसेच नंदुरबार येथून कृषी सहाय्यक संतोष नागरे, लक्ष्मीकांत भामरे आदी उपस्थित होते.








