नंदुरबार l प्रतिनिधी
विरोधकांकडून स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. जनतेची कामे करायची तर सोडाच परंतु, त्यांच्यामध्ये समज गैरसमज निर्माण करून दिशाभूल करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याच्या आरोप शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन माजी आ.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले,नंदुरबार शहराला आंबेबारा धरणातून पाणी पुरवले जाते. त्यामुळे परिसराला पाणी मिळत नाही असा गैरसमज ग्रामस्थांमध्ये विरोधकांकडून निर्माण करण्यात आला होता.आष्टे परिसरातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक विकास निधीतून आष्टा येथे मिनी बस स्टॅन्ड शेड, ग्रामपंचायत कार्यालय आवारात पेव्हर ब्लॉक व दुहेरी पाण्याच्या पंपाच्या हॅन्ड पंपचे उद्घाटन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, पं.स सभापती कमलेश महाले, कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र गिरासे, ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे,पं.स सदस्य प्रल्हाद राठोड,संतोष साबळे,तेजस पवार,माजी पं.स सदस्य दीपक मराठे,अविनाश भिल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी आष्टे येथील आदिवासी भातेजी महाराज भजनी मंडळांना भजन साहित्याचे शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने भजनी मंडळाच्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.








