Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद, नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

team by team
May 31, 2022
in राजकीय
0
प्रधानमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद, नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत देशात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिमला येथून तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून आज विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात दूरदृश्य प्रणालीमार्फत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.वि ) कृष्णा राठोड,

जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आर.पी.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी आदींसह विविध योजनांचे निवडक लाभार्थी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष अवघड नाही. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी भारताने दीडशेपेक्षा जास्त देशांना औषधी, लसचा पुरवठा केला. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लडाख, बिहार, त्रिपूरा, कर्नाटक, गुजरात व हिमाचल प्रदेशातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना,

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र- एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

तत्पूर्वी दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, योजना केंद्राच्या असो किंवा राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचविण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या आहेत. तसेच यापुढेही अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात याव्यात, असे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला, तसेच लाभार्थ्यांच्या काही अडीअडचणी आहेत का ते जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच नागपुर या जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजना व इतर केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री अस्लम शेख, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

काकर्दे विकासोवर भाजपा पुरस्कृत विकास पॅनलचे सर्वच उमेदवार बिनविरोध

Next Post

चक्क पंतप्रधानांना कुरिअरने पाठविला भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू

Next Post
चक्क पंतप्रधानांना कुरिअरने पाठविला भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू

चक्क पंतप्रधानांना कुरिअरने पाठविला भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add