नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील काकर्दे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड बिनविरोध पार पडली. या सोसायटीच्या चेअरमनपदी राजहंस हिरामण माळी यांची सलग तिसर्यांदा बिनविरोध निवड झाली. तर व्हाईस चेअरमनपदी शांतीलाल शंकर मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच घेण्यात आली. या निवडणूकीत आ.डॉ.विजयकुमार गावित यांचे भाजपा पुरस्कृत विकास पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून आले. त्यानंतर काकर्दे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विकासोच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया घेण्यात आली.
यावेळी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. काकर्दे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजहंस हिरामण माळी यांची सलग तिसर्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तसेच व्हाईस चेअरमनपदी शांतीलाल शंकर मराठे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म.श.महाजन यांनी निवड घोषित केली. त्यांना सोसायटीचे सचिव रफिक शेख यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य गुलाब लक्ष्मण खलाणे, कन्हैय्यालाल भटू माळी, देविदास रामदास माळी, धनराज शंकर माळी,
भावराव राघो माळी, महादु तुकाराम माळी, पुंजू सिताराम मराठे, कांतीलाल सदु भिल, हिराबाई राजहंस माळी, सरलाबाई राजेंद्र माळी तसेच दत्तात्रय खलाणे, भटु माळी, युवराज माळी, रविंद्र माळी, राकेश माळी, भाईदास भिल, भावराव माळी, हरीचंद्र माळी, नरेंद्र माळी, दिपक वाघ, संतोष माळी, भटु बेंद्रे, शांतीलाल माळी, कल्पेश माळी आदी उपस्थित होते.








