मुंबई l प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांच्यावर 1 जून रोजी ऑपरेशन करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पायाच्या आजाराने त्रस्त होते. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर येणार होते.
मात्र, पाय दुखू लागल्याने राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. अखेर आता या शस्त्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.








