नवापूर l प्रतिनिधी
शहरातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पुलाच्या बांधकामासाठी देवळफळी भागातील अनेक व्यावसायिकांचे दुकान तसेच नागरिकांचे घर तोडण्यात आले आहेत यामुळे या भागातील अनेक नागरिक बेघर झाले असून सोबतच दुकान उध्वस्त झाल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.
या दुकानदार व नागरिकांची भारतीय जनता पाटीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत भरत गावीत यांनी देवळफळी भागातील दुकानदार व नागरिकांची बाजू मांडत त्यांना उदरनिर्वाहासाठी व निवाऱ्यासाठी नगरपालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.यावेळी तहसील कार्यालयात मुख्य अधिकारी स्वप्नील मोधलवाडकर,
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, अभियंता संदांशिव भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख ,जयंतीलाल अग्रवाल, अजय गावित निलेश प्रजापत कृणाल दुसाने देवळफळी भागातील रहिवासी आदी उपस्थित होते.








