नंदुरबार l प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी आयपीएल मध्ये गुजरात टीम जिंकल्या बद्दल टाटातर्फे 599 चा रिचार्ज फ्री अशा आशयाचे मेसेज फिरत आहेत.अशा आमीषाला तुम्ही बळी पडत असाल तर सावधान!
यातून तुमची फसवणूक होवू शकते यामुळे नागरिकांनी अशा आमीषांना बळी पडू नये असे आवाहन नंदूरबार सायबर सेल तर्फे करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी अचानक व्हॉटसॲपवर मॅसेज येतो आणि त्यात आपल्याला लाखोंची लॉटरी लागल्याचे आमीष दिले जाते. कौन बनेगा करोडपतीच्या नावाखाली अनेकदा नागरिकांना खोटे संदेश प्राप्त झाले होते.
अशा असून त्यातून त्यांना लाखोंची आमीषांना लॉटरी लागल्याचे आमीष दिले जात आहे. यामुळे नागरिकांनी अशा आमीषांना बळी न पडता केले आहे.
सध्या सोशल मीडियावर आयपीएल मध्ये गुजरात टीम जिंकल्या बद्दल टाटातर्फे 599 चा रिचार्ज फ्री अशा आशयाचे मेसेज फिरत आहेत.तो मॅसेज खोटा असून सायबर चोरटे नागरिकांना सध्या फसविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या क्लृप्त्या वापरत आहेत. नागरिकांना आमीष दिले जाते आणि त्यातून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.कृपया अशा संदेशांच्या लिंक उघडू नयेत. त्यामुळे फोन हॅक होण्याचा किंवा प्रसंगी आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे.

असे संदेश आपल्याला आल्यास उघडून न पाहता थेट डिलिट करावेत.अशा फसव्या लिंक पासून नागरिकांनी सावधान रहावे असे आवाहन नंदूरबार सायबर सेल ने केले आहे.
वर नमूद मेसेज मधील दिलेली लिंक ही फेक आहे . सायबर हॅकर्सनी अशा प्रकारच्या फेक लिंक तयार केल्या असून या लिंक वर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईल मधील डाटा , संपर्क क्रमांक तसेच इतर गोपनीय माहिती हॅकर्स पर्यंत पोचू शकते .
दरम्यान सध्या टाटाची कुठलीही टेलिकॉम सुविधा नाहीय 2019 मध्ये टाटा डोकोमो एअरटेल मध्ये मर्च करण्यात आले आहे.
त्या आधारे आपली आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते . तरी सर्वांनी अशा प्रकारच्या लिंक शेअर करू नये तसेच त्यावर क्लिक करू नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.








