तळोदा l प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वात जुनी आणि नामांकित शाळा म्हणजे शेठ के डी हायस्कूल तळोदा या शाळेने हजारो विद्यार्थी घडविले आहेत आणि समाजातील विविध क्षेत्रात हे विद्यार्थी यशस्वी वाटचाल करीत आहेत.
शैक्षणिक वर्ष 1998-99 ला इयत्ता 10वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 23 वर्षांनंतर शाळेत येऊन सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहसंमेलन आयोजित केला.
अगदी शाळेची सुरुवात जशी प्रार्थनेने व्हायची त्याचप्रमाणे प्रार्थना व परिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात 1998-99 ला अध्यापन करणारे शिक्षक जे आज सेवानिवृत्त झाले असून वयोवृध्द ही झाले आहेत.त्या शिक्षकांनीही आवर्जुन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. शिक्षकांचे नुसते सत्कार न करता गुरुपूजन करण्यात आले.
गुरुपूजनाने शिक्षकांचे डोळे पाणावले एक सुखद अनुभव त्यांनी घेतला.दिवंगत शिक्षक स्व. ड.डी. वाणी यांचे नुकतेच निधन झाले आहे विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या स्नेहसंमेलनाला महाराष्ट्र, भारतातील विविध जिल्ह्या सह इतर राज्यात विविध पदावर आणि क्षेत्रात काम करणारे विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.यात विद्यार्थिनींचाही मोठा उत्साह दिसून आला.
सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय आणि आपण सध्या काय करीत आहोत याबद्दल माहिती दिली.विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील यश बघून शिक्षक वृंदांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शेठ के डी हायस्कूल चे विद्यमान मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी होते.
तर सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.शिक्षक वृंदांनी अतिशय भारावलेल्या मनाने मनोगत व्यक्त केली.
स्नेहभोजन व त्यांतर शाळा सुटल्यावर वाजणारी गजर ने स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमानंतर स्नेह भोजनची व्यवस्था माळी समाज मंगल कार्यालयात आली होती.
कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी वेंकटेश मगरे,जसवंत महाजन,स्वप्नील महाजन, सचिन पाटील,राजेश शेंडे, मिथुन जोहरी,योगेश मराठे,विक्रांत पाटील,अजय मोटे,दीपक मगरे,
संदीप उदासी,गिरीश राणे,राकेश मराठे,निलेश सोनार,शैलेंद्र महाले,देवेंद्र जोहरी,नितीन वाणी,नयन शहा,मनीष जैन,सरिता,ललिता वाणी, पूनम माळी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र गुरव व स्नेहल धोदरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन डॉ तुषार जावरे यांनी केले.








