नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे हमदर्द एज्युकेशन ऍण्ड मल्टीपर्पज फाऊंडेशनतर्फे ऑल मुस्लिम सामुहिक विवाह सोहळा रज्जाक पार्क , नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला होता .
सदर सामुहिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध जिल्ह्यातील समाज बांधवांनी तसेच शहरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी हजेरी लावली होती .
सदर विवाह सोहळ्यात ऑल मुस्लिम समाजाच्या १० जोडप्यांचा विवाह मुस्लिम जातीरिवाजाप्रमाणे लावण्यात आला . विवाह सोहळा हा अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला .
यापूर्वीही हमदर्द फाऊंडेशनच्यावतीने दोन वेळा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . त्यात पहिल्यावर्षी १६ तर दुसर्या १४ तर यंदा १० जोडप्यांचा सामुहिक विवाह संपन्न झाला .
या विवाह सोहळ्यास मा.आ.चंद्रकांत रघुवंशी , युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ . अभिजित मोरे , माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी , विजय यादव माळी , माजी नगराध्यक्ष रविंद्र परदेशी, विलास रघुवंशी , नगरसेवक फारुक मेमन ,नगर सेवक फरीद मिस्त्री, रियाज कुरेशी , पप्पु कुरेशी ,
एमआयएमचे सैय्यद रफअत हुसेन आदी मान्यवरांनी सदर विवाह सोहळ्यास उपस्थिती देवून उभयंतांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रम यशस्वितेसाठी हमदर्द फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष सिकंदर हाजी जहीर कुरेशी , अध्यक्ष नुर जुबेर मुनब्बर खान ,
उपाध्यक्ष इम्रान मोहम्मद काकर , संचालक मुजाहिद मियॉं अर्शद मियॉं , सोहेल मनियार , मोहसिन रहिम शेख , नदीम गणो कुरेशी , आसिफ पिंजारी , सुलेमान हनिफ कुरेशी , शाहरुख सुभान खान , अजहर शविर शहा युनुस इकबाल खान ,
शारुख रशिद खाटीक , शोहेब साबिर पिंजारी , शफिक काझी , आतिफ गफ्फार , जुनेद रऊफ साधी , साबिर उस्मान हलवाई आर्दीसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले .
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजहरमियॉं मजहरमियॉं यांनी तर आभार प्रदर्शन अनिस हलवाई यांनी केले .