तळोदा । प्रतिनिधी
स्मशानाची जागा (म्हसाणवट) वरील अतिक्रमण काढून जागा मोकळी करणे बाबत कार्यवाही करण्यात येणे बाबत तळोदा तालुक्यातील समस्त धानका समाज तळोदा, दलेलपूर, चिनोदा येथील समाज बांधव यांच्या वतीने तळोदा तहसिलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा येथील सर्व्हे क्र.४८९/ब.भू.मा.क्र.७७/ब-१ पैकी हे.१-९३ आर पैकी १३ आर आमच्या समाजास स्मशानभूमी (म्हसाणवट) म्हणून सन १९९६-९७ पासून शासनाकडून देण्यात आलेली असून सदर म्हसाणवटचा वापर आम्ही आमच्या समाजात कोणीही नागरिक मयत झाल्यास दफनविधीसाठी करत आलो आहोत व आजही करीत आहोत. सदरील म्हसाणवट तळोदा येथे बायपास रोडवरील खर्डी नदीच्या पलीकडे पूलाच्या बाजूस उत्तर-दक्षिण दिशेस आहे.
परंतु सदरील स्मशानभूमीचे (म्हसाणवट) चे दक्षिण बाजूस असलेल्या गट क्र.७६ २/१ मधील खातेदार मेफा पोपट भरवाड, मेदा जागो भरवाड, हाजा पोपट भरवाड यांनी सदरील म्हसाणवटातील जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करुन घरे बांधून त्यांचे गुरे सदरील जागेत बांधत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गुरांच्या विष्ठेमुळे घाण होत असून आम्ही दफन केलेल्या मृतदेहांची हेळसांड होत आहे.
सदरील प्रश्न हा आमच्या भावनेशी संबंधित असल्याने सदरील अतिक्रमण धारक मेफा पोपट भरवाड, मेदा जागो भरवाड, हाजा पोपट भरवाड रा.दलेलपूर यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांनी केलेले अतिक्रमण काढून करण्यात आलेली घाण तात्काळ मोकळी करण्यास आदेशीत करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तळोदा तालुक्यातील समस्त धानका समाज तळोदा, दलेलपूर, चिनोदा येथील समाज बांधव यांच्या वतीने तळोदा तहसिलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर दिलीप धानका, बबन धानका, सुरेश धानका, ताराचंद धानका, शिवदास धानका, मनिलाल धानका, संदिप धानका, रतिलाल धानका, दशरथ धानका, पारशी धानका, मानसिंग धानका, वीरु धानका, रविंद्र धानका, ईश्वर धानका, जादू धानका, विजू धानका, सतर्या धानका, रविंद्र धानका, किशोर धानका, विनोद धानका, रायसिंग धानका, शैलीबाई धानका, सुरमीसाबाई धानका, दिसा धानका, रविंद्र धानका, राजकुमार धानका, गोरख धानका, कनिलाल धानका, जयराम धानका, बबन धानका, विनोद धानका, निलेश धानका, अशोक धानका, रविकांत धानका, जयराज धानका, अमृत धानका, मेघराज धानका, अनिल धानका, अमरसिंग धानका, सुरेश धानका, गुलाब धानका, बबन धानका, अविनाश धानका, सदु धानका, करसन धानका, मादु धानका आदींच्या सह्या आहेत.