नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील चावरा हायस्कुलजवळ चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील चावरा हायस्कुल जवळ लखन मक्का भील व भामटू पाडवी दोघे रा.घुलीपळाशी ता.नंदुरबार हे रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत फिरतांना आढळून आले . पोलिसांनी त्यांच्याकडून एक स्क्रू – चावी जप्त केली आहे . याबाबत पोना.स्वप्निल पगारे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात भादंवि कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहे कॉ.नागरे करीत आहेत .