नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील जामली ते सल्लीबार रस्त्यालगत एका झोपडीत पेट्रोल-डिझेलची चोरटी विक्री करतांना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील जामली येथील राज्या गोरजी तडवी हा जामली ते सल्लीबार रस्त्यालगत असलेल्या एका झोपडीच्या आडोश्याला
मानवी जिवीतास हानीकारक असे ज्वालाग्रही पदार्थ पेट्रोल-डिझेल सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता विक्री करतांना आढळून आला.
याबाबत पोशि.दीपक न्हावी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात राज्या तडवी याच्याविरोधात भादंवि कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.बुनकर करीत आहेत.








