नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील २ मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन उकल करण्यात आली असून आरोपीसह चोरीचा ५ मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना निर्देश दिलेले आहेत . त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहवा रविंद्र पाडवी , महेंद्र नगराळे , पोना राकेश मोरे , राकेश वसावे , पोकॉ अभय राजपुत , आनंदा मराठे यांचे पथक स्थापन करुन मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा अभ्यास करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने बातमीदार नेमण्यासाठी मार्गदर्शन केले . नमुद पथकाकडुन तपास सुरु असतांना दि. ८ ऑगस्ट रोजी पोनि रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , नवापुर चौफुली परिसरात एक इसम विना कागदपत्राची मोटर सायकल विक्री करण्यासाठी येणार आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि कळमकर यांनी नमुद पथकास बातमीचे ठीकाणी जाऊन सापळा लावण्यास सांगितले . त्यानुसार पथकाने नवापुर चौफुली परिसरात सापळा लावून संशयीतरित्या एक लाल रंगाची मोटरसायकल घेऊन फिरणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अविनाश शामु गावीत , रा . वाघाळे असे सांगितले . त्यास त्याचेकडील मोटर सायकलीचे कागदपत्र मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला . त्यामुळे त्यावेवरील संशय वाढल्याने त्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कार्यालयात आणुन पोनि कळमकर यांनी विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदर मोटर सायकल चोरीची असल्याचे मान्य करुन दि.७ ऑगस्ट रोजी हिरा वाईन शॉप समोरुन चोरली सांगुन इतर ४ मोटर सायकलीदेखील चोरल्या असल्याने कबुल केले . त्याने सांगितल्यानुसार इतर ४ मोटर सायकलीदेखील पथकाने हस्तगत करुन आरोपीसह एकूण ९० हजाराच्य ५ मोटर सायकली जप्त करून पुढिल तपासासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोहवा रविंद्र पाडवी , महेंद्र नगराळे , पोना राकेश मोरे राकेश वसावे , अभय राजपुत आनंदा यांचे पथकाने पार पाडली असुन मोटर सायकल चोरी झाल्यानंतर अवघ्या २४ तासाचे आत गुन्हा उघडीस आणून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमालदेखील हस्तगत केल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे .