नवापूर | प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निषेध करीत नवापूर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे चपला, बांगड्या व कुंकू यांचा आहेर पोस्टाव्दारे पाठविण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडाडून टीका करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खा.सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे.चंद्रकांत पाटलांची जीब घसरली ते म्हणाले की ,
तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा खासदार असून तुम्हाला कळत नाही.तुम्ही दिल्लीत जा नाहीतर म्हसणात जाऊन शोध घ्या आणि आरक्षण द्या, अशी टीका केल्यानंतर नवापूर येथे त्याचे पडसाद उमटले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने संतप्त प्रतिक्रिया देत निषेध केला.नवापूर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चपला, बांगड्या व कुंकू यांचा आहेर कुरिअर या माध्यमातून नवापूर पोस्टातून पाठविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष आकाश गावित यांनी स्वतः नवापूर पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन शंभर रुपयांचे रजिस्टर करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चपला,बांगड्या व कुंकू याचा आहेर कुरिअर करून पाठविला.
यावेळी नवापूर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश गावित,शहराध्यक्ष कान्हा आतारकर, शहर उपाध्यक्ष अजय कुराडे,निलेश गावित, राज बोरसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.