नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील गेंदाचा पाटीलपाडा येथे पत्नीवर संशय घेत पतीने व तिने कुर्हाडीने डोक्यावर मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील गेंदाचापाटीलपाडा येथे राहणार्या रोहिदास पावराने गावातील लोकांशी का बोलते असे म्हणून पत्नीवर संशय घेवून कुर्हाडीने तिच्या डोक्यावर मारहाण केली.
यात डुडीबाई रोहिदास पावरा यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी डुडीबाई रोहिदास पावरा रा.गेंदाचा पाटीलपाडा (ता.धडगांव) यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात रोहिदास जयसिंग पावरा याचा विरूध्द भादंवि कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना कालूसिंग पाडवी करीत आहेत.