नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे पिकातून गाडी घेवून जावू नका, असे सांगितल्याने विळयाने मारहाण करीत असतांना पती पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे हेमलता पाटील यांच्या शेतातून विलास हरी पाटील हे बैलगाडीने गुरांचा चारा घेवून जात असतांना हेमलता पाटील यांनी भुईमूग पिकातून गाडी घेवून जावू नका असे सांगून विलास हरी पाटील व योगीता विलास पाटील यांनी लोखंडी विळयाने हल्ला केला.
यात हेमलता विकास पाटील व त्यांचे पती विकास पाटील यांना दुखापत झाली. याप्रकरणी हेमलता विकास पाटील रा.खोंडामळी (ता.नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात विलास हरी पाटील, योगीता विलास पाटील यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सुनिल अहिरे करीत आहेत.