नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार जिल्हा मल्लखांब असोसिएशन व नंदुरबार जिल्हा जम्प रोप अमैच्युअर असोसिएशन व बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमी सोरापाडा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे समारोप कार्यक्रम सोरापाडा येथे झाला.
या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील , व वरिष्ठ महाविद्यालय शहादाचे प्राचार्य डॉ शांताराम बडगुजर, प्राध्यापक दीपक वळवी, नंदुरबार जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सचिव शांताराम मडाले,व डॉ.मयूर ठाकरे , दिनेश बैसाने ,
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था प्रकल्प वेवस्थापक प्रमोद वाणी, सूरज सोनवणे, अजय सोनवणे , ॲड. बंडू जोशी, सरपंच किरण वसावे, पोलीस पाटील प्रकाश पाडवी, खेळाडू प्रवीण वळवी,शिवदास पाडवी,विनोद वळवी,गिरीश पाडवी, प्रवीण प्रधान, सुहाश वळवी,तुषार सोनवणे, रोहित दिलवरसिंग वळवी,आशिष पाडवी,
इरफान खाटीक व बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमीचे सदस्य रविंद्र पाडवी, अंगनवाडी सेविका संगीत पाडवी, जर्मीबाई पाडवी आदींनी उपस्थिती दर्शवली होती.
5 मे ते 25 मे दरम्यान सोरापाडा व आमलाड येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले या दरम्यान खेळाडू साठी मल्लखांब, योगा, जिमनस्टिक, एरियल स्पोर्ट्स, जम्प रोप,रोप मल्लखांब आदी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांनी शिक्षणा सोबतच मैदानी खेळा कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे स्पोर्ट्स मध्ये ही करियर घडवता येऊ शकते,आदिवासी मुला मध्ये खूप कौशल्य असते जर योग्य वेळात मार्गदर्शन भेटले तर ते नक्कीच पुढे स्पर्धेत स्पर्धेत टिकू शकतील व भविष्य घडवू शकतील असे प्रतिपादन श्रीमती सुनंदा पाटील यांनी केले,
या शिबिरात 147 विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदवला होता, या कार्यक्रमात शिबिरातील विद्यार्थ्यांनी मल्लखांब वरील पिरॅमिनी व रोप मल्लखांब, आणि जम्प रोपचे प्रात्यक्षिक केले, मल्लखांबचे चित्त थरारक प्रदर्शन केले, या नंतर खेळाडू ना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वीस दिवशी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरासाठी अनमोल पाडवी सोरापाडा , अजय वळवी रतनपाडा,गणेश पाडवी, शिवाजी वसावे, आरती ठाकरे,हिना वळवी,चुणीलाल पाडवी, रामसिंग पाडवी, सुशीला वसावे,इंद्रजीत पाडवी,सुनीता वळवी,रोहित वळवी या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले, सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सुशीला वसावे यांनी केले कार्यक्रम चा शेवट हा राष्ट्रगीता ने झाला.