नंदुरबार l प्रतिनिधी
विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील खातगाव फाट्याजवळ दुपारी २ वाजेच्या सुमारास मालवाहतूक बोलेरो वाहन चालकाचे भरधाव वेगात नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन अपघात झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर विसरवाडी च्या दिशेने जाणारे पिकअप बोलेरो वाहन (क्र. एम. एच. 39, डब्ल्यू.0164) मालवाहतूक बोलेरो वाहन विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर विसरवाडी दिशेने जात असताना खातगाव फाट्याजवळ वाहन चालक कृष्णा नरसी गावित रा. वागदी याचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी झाले.
या अपघातात रंजीत पंडित गावित व निलेश पंडीत गावित दोन्ही रा. वागदी ता. नवापूर गंभीर जखमी झाले.अपघात होताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी खाजगी वाहन द्वारा जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल दिनेश चित्ते, पोलीस कॉन्स्टेबल लीनेश पाडवी, पोलीस पिंटू पावरा, पोलीस अंमलदार घटनास्थळी धाव घेतली.