धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील हरणखुरी गावातील मोलगी मुख्य रस्त्यापासून पाटीलपाडाला जोडणाऱ्या रस्त्याचे नामकरण व फलकाचे उद्घाटन करण्यात आले. गाव विकासात दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून चक्क गावातील रस्त्याला संस्थेचे नाव देण्याचे ग्रामसभेत निर्णय घेतला होता.
आदिवासी जनजागृती मागील पाच वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यामध्ये समाजात विवीध विषयावर बोली भाषेतून जनजागृती, फसवे संदेश (Fake News) व स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवुन ही प्रश्न सोडविण्याचे कार्य करत आहे .
हरणखुरी गावात गाव विकासकामे, पर्यावरण संवर्धन, स्थानिक मुद्दे व समाजात विविध विषयावर स्थानिक भाषेतून जनजागृतीचे कार्य करत आहे. या कामामुळे आदिवासी जनजागृती टीमला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित कार्यात आलेले आहे.
या माध्यमातून आदिवासी जनजागृती टीमने हरणखुरी गावाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी निर्माण केली. यांच्या सन्मानार्थ गावकारीच्या वतीने “ मोलगी मुख्य रस्त्यापासून पाटीलपाडा रस्त्याला “ आदिवासी जनजागृती मार्ग ” (Aadiwasi Janjagruti Road) असे नामकरण करण्यात आले. हा निर्णय ग्रामसभेत बहुमताने पारित करण्यात आला.
या फलकाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक गोकुळ औताळे (धडगाव पोलीस ठाणे,धडगाव) व योगेश नाईक (मनेजर, SBI शाखा धडगाव) यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलतांना पोलिस निरीक्षक गोकुळ औतळे यांनी गावांतील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन तयार केलेल्या आदिवासी जनजागृती टीमच्या कामामुळे तालुक्यातील अनेक प्रश्न सुटत असुन सोशल मिडियाचा वापर समाजहितासाठी कसा उत्तम वापर करता येऊ शकतो यांचे उत्तम उदाहरण जनजागृती टीम आहे हे कार्य अविरत चालावे अश्या शुभेच्छा दिल्या. तर प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील यांनी “ आदिवासी जनजागृती मार्ग हा हरणखुरी गावाला विकासाकडे घेऊन जाणारा असल्याचे उदगार काढले.
“ आमच्या गावात आदिवासी जनजागृती टीमने सुरु केलेल्या विकासकामाच्या चळवळीमुळे आमच्या गावात आज मुलभूत सुविधा, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार, ६५ हेक्टरवर सुरु असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कामामुळे वृक्ष संवर्धनासह गावात गुरांचा चाराचा प्रश्न मिटला आहे. अशी अनेक गाव विकासाची कामे जनजागृती टीमच्या माध्यमातून होत आल्याने त्याचा सन्मान व्हावा व एक आठवण राहावी म्हणून गावकरींनी या मार्गाला आदिवासी जनजागृती मार्ग असे ठेवण्याचा निर्णय घेतला ” – उग्रावण्या पावरा (पोलीस पाटील,हरणखुरी)
“ आदिवासी जनजागृती टीमच्या पुढाकारातून हरणखुरी गावात विविध विकासकामासह रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामे केली जात असून अकुशल कामगारांना रोजगार आणि भविष्यात गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.” – एच. आर. वंजारी (ग्रामसेवक भूजगांव)
कोविड-19 महामारीच्या काळात धडगाव तालुक्यातील खेडो-पाड्यात महितीच्या अभावी कोरोना विषाणू व लसीकरणाविषयी अनेक समज- गैरसमज होते. अश्या संकटाच्या काळात आदिवासी जनजागृतीची संपूर्ण टीम बोली भाषेतून लघुचित्रपट तयार करून करून सोशल मीडियावर प्रसारित करून जनजागृती केले. त्यामुळे समाजात कोविड लसीकरण विषयी गैरसमज दूर होऊन लसीकरण वाढण्यास मदत झाली.
योगेश नाईक (मॅनेजर SBI शाखा धडगांव )