म्हसावद l प्रतिनिधी
पीपल्स रिपब्लिकन पार्टी नंदुरबार जिल्हा तर्फे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जळगाव येथील जगन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष विकी मोरे यांचे नेतृत्वाखाली राज्यव्यापी तिरंगा रॅली शहादा येथून मुंबईकडे रवाना झाली.
सकाळी 11 वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे व जिल्हाध्यक्ष विकी मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्या उपस्थितीत मोटर सायकल तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
डोंगरगाव रस्त्याने सरळ श्री क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले नंतर दोंडाईचा रस्त्याने मोटर सायकल रॅली रवाना झाली.
मोटरसायकल तिरंगा रॅलीत जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील जिल्हा सचिव बापूराव गवळे जिल्हा सरचिटणीस इमरान मेमन इम्रान पठाण रवींद्र शिरसाठ रमेश निकुंभे राज मोरे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
सुशिक्षित बेरोजगारांना शासनाने रोजगार उपलब्ध करावा शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी शहादा नगरपालिकेत करण्यात आलेली विकास कामाची चौकशी करण्यात यावी या सह इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
श्री क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचे शहादा तालुका राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत व संचालक अजबसिंग गिरासे यांनी स्वागत केले.पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पण 25 मे रोजी रॅली मंत्रालयात पोहोचली.








