तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
चिनोदा येथील नागेश्वर मंदिर प्रांगणात जागतिक आदिवासी दिन अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी बिरसा मुंडा व देवमोगरा माता यांच्या प्रतिमांचे पूजन ताईबाई सुरेश ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला चिनोदा गावातील आदिवासी बांधव, महिला, तरूण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.