नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नगरपालिका शाळा क्र.१ समोरील परिसरातून अज्ञाताने घरात प्रवेश करत दागिने असणारी पर्स चोरुन नेत सुमारे ६२ हजाराचा ऐवज लंपास केला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरात नगरपालिका शाळा क्र.१ समोर राजू शांताराम साळी राहतात.दि.१७ ते १८ मे दरम्यान त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याने कोणीतरी अज्ञाताने संधी साधून घरात प्रवेश केला.
घरात हँगरला अडकवलेली पर्स चोरुन नेली.सदर पर्समध्ये ५० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे १३ ग्रॅम दागिने व १२ हजाराची रोकड असा ऐवज होता.
याबाबत राजू शांताराम साळी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते करत आहेत.








