नंदुरबार । प्रतिनिधी
नंदूरबार येथे भाजपातर्फे संत भीमा भोईंना अभिवादन करण्यात आले.
शहरातील नवी भोई गल्ली , बालवीर चौक येथे श्री संत भीमा भोई यांच्या १७१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , खा.डॉ.हिना गावित , आ . डॉ . विजयकुमारगावित , जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी , शहराध्यक्ष नरेंद्र माळी , अनु . जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर , भटके – विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे ,
रावसाहेब चंद्रकांत नुक्ते , पप्पू खेडकर , जितेंद्र भोई , राजू लाळे , प्रताप सोनवणे , श्री संत भीमा भोई जयंती उत्सव समिती सदस्य व समाजबांधव उपस्थित होते . यावेळी भोई समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचा श्री संत भीमा भोई यांची प्रतिमा , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .