नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बिलगव्हाण गावाजवळ दुचाकींमध्ये धडक झाल्याने घडलेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील उमराण येथील दिलवर जाणू पाडवी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र. (एमएच ३९ डी.९५६७) घेवून भरधाव वेगाने जात असतांना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने दुचाकी चालविली.
यात बिलगव्हाण येथील संदेश सुरूपसिंग वळवी हे त्यांच्या दुचाकीने क्र.(एमएच ३९ एए ७९३५) जात असतांना दिलवर जाणू पाडवी यांच्या दुचाकीने संदेश वळवी यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
अपघातात संदेश वळवी यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून दुचाकींचे नुकसान झाले आहे.याबाबत संदेश वळवी यांच्या फिर्यादीवरुन दिलवर पाडवी याच्याविरोधात
नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम २७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गिरधर सोनवणे करत आहेत.