नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खोडी येथील एकाने १४ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देत पळवून नेले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील खोडी येथील विलास बामण्या वसावे याने खोडीचा बारीपाडा येथून १४ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देत फूस लावून पळवून नेले आहे.
याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित विलास वसावे याच्याविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाघ करत आहेत.