नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव येथील आरोग्य विभागाच्या लेखापाल कक्षातून अज्ञात चोरट्यांनी संधी साधून संगणक व प्रिंटर चोरुन नेले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयातील लेखापाल कक्षातील मुख्य दरवाजाचे कुलूप कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला.संधी साधत २१ हजाराचे संगणक व लेझर प्रिंटर चोरुन नेले.
याबाबत संतोष नारायण माळी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात भांदवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे करत आहेत.