नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 8 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घातली.दरम्यान या आगीत शेतकरी आगीत जखमी झाला आहे.
नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथे 15 महिने होऊन सुद्धा ऊस तोड झाली नाही. ऊस उत्पक खूप चिंतीत आहे.पावसाळा तोंडावर असतांना ऊस मात्र शेतात उभा आहे. अश्या परस्थितीत विदयुत तारा चा फॉल्टमुळे 8 एकर ऊस जळाला,
आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना शेतकरी मानसिंग गिरासे यांचा तोल जाऊन अंगातील कपडे जळाले. प्रसंग अवधान राखत गावातील युवकांनी त्यांना वाचवले. या आगीचा पोलीस पंचनामा करीत आहेत.