नंदुरबार l प्रतिनिधी
भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई जयंती निमित्त बुधवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 10:30 वाजता प्रतिमापूजन, अभिवादन आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी रथाद्वारे भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. जयंती उत्सव समितीतर्फे जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
श्री संत भीमा भोई जयंती उत्सव समिती 2022 अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत भीमा भोई जयंती निमित्त उद्या बुधवारी सकाळी 10:30 वाजता बालवीर चौक नवी भोई गल्ली या ठिकाणी प्रतिमापूजन अभिवादन कार्यक्रम होईल.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संसदरत्न खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, विधान परिषदेचे माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे,
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अड. राम रघुवंशी, माजी नगराध्यक्ष रवींद्र पवार, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र चौधरी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, किरण रघुवंशी,
गौरव चौधरी, दीपक दिघे, आकाश चौधरी, नगरसेविका भारती राजपूत, संगीता वसईकर, माजी नगरसेवक अर्जुन मराठे, प्रकाश भोई, रामकृष्ण मोरे,माजी उप अभियंता रमेश वाडीले, हरिचंद्र भोई, इंजिनीयर किरण तडवी, आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बुधवार दि. 25 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता संत श्री भीमा भोई यांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल संजय नगर, गवळीवाडा, संतोषी माता मंदिरापासून शोभा यात्रेस प्रारंभ होऊन नवनाथ नगर, नवी भोई गल्ली बालवीर चौक,
जुनी भोई गल्ली, सिद्धिविनायक चौक, सुभाष चौक, वळसा घालून अमृत चौकमार्गे अमर सिनेमा गृहापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप होईल.
अभिवादन आणि शोभायात्रा उत्सवात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संत भीमा भोई उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोई,उपाध्यक्ष जितेंद्र खेडकर, सचिव प्रताप सोनवणे, भोई समाज पंचकमिटी अध्यक्ष चंद्रकांत खेडकर आणि सर्व भोई समाज यांच्यातर्फे करण्यात आले आहे.