नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील उमर्दे गावाच्या शिवारातील शेतातून चोरट्याने सुमारे १७ हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टरचे साहित्य व इलेक्ट्रिक मोटार चोरुन नेली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील हिरालाल विश्वास पाटील यांच्या मालकीचे गावात शिवारातील सर्वे क्र.२८/०१ या शेतात पत्र्याचे घर आहे.
सदर घरात चोरट्यांनी प्रवेश करुन ४ हजार लोखंडी पास, ७ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार, २ हजार रुपये किंमतीचे लोखंडी नट, २ हजार रुपये किंमतीचे दोन पाटा, १ हजार ५०० रुपये किंमतीचे बैलाचे औताचे साधन व वखार पास असे एकूण १६ हजार ५०० रुपये किंमतीचे साहित्य चोरुन केले.
याबाबत हिरालाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुनिल अहिरे करीत आहेत.








