नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील असली येथील पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली.
असली ता.धडगाव येथील पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोनिया सिपा वळवी यांनी कॉंग्रेससह अपक्ष तर संगिता सिपा वळवी, कल्पना मगन वसावे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.








