नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण चुकीचे केले असून ते नवीन करण्यात यावे या मागणीचे निवेदन सकल जैन समाजातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्राकडून राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षण ५ चा अहवाल नुकताच करण्यात आला त्यात जैन धर्मीयांत १४.९ टक्के पुरुष, ४.३ टक्के महिला मासांहारी असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
जैन समाज हा शाकाहारीचा पुरस्कर्ता आहे. हे सर्वेक्षण चुकीचा माहीतीवर आधारीत आहे. जैन समाजाचा त्यावर विश्वास नाही. आमच्यापर्यंत कधीच कोणी माहिती विचारण्यासाठी आलेले नाही.
हा जैन समाजाच्या बदनामीचा डाव आहे. सर्व्हला सत्याचा आधार नाही. चुकीचा माहीतीवर आधारलेले आहे. त्याचा सकल जैन समाज निषेध करतो.संपूर्ण देशात अश्या चुकीच्या माहीतीमुळे आक्रोश पसरत आहे.
जैन समाज लहानशा मुंगीला मारण्यात पाप समजतो. अहिंसा परमो धर्म जीयो और जीने दो ह्या मुलभुत तत्वावर चालणार्या जैन समाजावर असा आक्षेप करणे म्हणजे त्या समाजाचा अहिंसक समाज असलेल्या प्रतिमेचे हनन आहे.
अल्पसंख्याक असलेल्या जैन समाजाच्या धार्मिक भावना दुःखविल्या जात असल्या कारणाने ह्या सर्वे चा पुनः सर्वेक्षण केले पाहीजे व झालेले सर्वेक्षण रद्द करण्यात यावे.संपूर्ण जैन समाजाचा भावना लक्षात घेवुन ह्या गोष्टीवर त्वरीत लक्ष देऊन योग्य त्या कार्यवाहीसाठी विनम्र निवेदन.
यावेळी निवेदनावर श्री समस्त दिगंबर जैन समाज, श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री जैन स्थानकवासी संघ,श्री जैन श्वेतांबर तेरापंथी संघ यांच्या मार्फत निवेदनावर संघांचे अध्यक्ष सुरेश जैन, दिलीप शाह, मदनलाल जैन ,विरल जैन, कमलेश जैन, पीनल शाह यांच्या सह्या आहेत.








