Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे : महाविद्यालयीन तरूणीची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

team by team
May 23, 2022
in क्राईम
0
अरे बापरे : महाविद्यालयीन तरूणीची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील निझर तालुक्यातील जुना कुकरमुंडा जवळील तापी पुलावरून नापास होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी तापी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, युवती घरून बसमध्ये बसून गुजरात राज्यातील निझर तालुक्यातील वेलदा टाकी जवळ उतरली तेथून चालत चालत जुना कुकरमुंडा जवळील तापी नदीच्या पुलावर गेली.

५० ते ६० फूट तापी नदीच्या पुलावरून तिने खोल पाण्यात उडी मारली.दरम्यान तापी नदीमध्ये प्रचंड पाणी होते. युवती बुडत असल्याचे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरड केली.

त्यानंतर नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला वाचण्यासाठी जलद गतीने तीन युवकांनी मुलीच्या दिशेने बोट नेली. हवेच्या प्रचंड वेग असल्याने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

त्यानंतर नदीत बुडत असलेल्या युवतीला बोटीवर घेतले. मच्छिमार करणाऱ्या तरुणांनी तीचे प्राण वाचवले.तिला बाहेर काढून तिला रुग्णवाहिकेतून निझर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. युवती सुखरूप असून तिची ओळख पटली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर गावातील वीस वर्षीय तरुणी पार्वती रवींद्र पाडवी असे युवतीचे नाव आहे. अक्कलकुवा येथे एस.वाय.बी.ए चे शिक्षण घेत होती.15 जून 2022 रोजी परीक्षा होती.

तिचा अभ्यास न झाल्याने नापास होण्याच्या भीतीने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महाविद्यालयातील प्रशासनाने आत्महत्या करू नये व परीक्षेची भीती दूर करण्यासाठी समुपदेशन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आत्महत्याची टोकाची भूमिका घेऊ नये सर्व परिस्थितीत मार्ग काढता येतो.संयमाने आणि धैर्याने काम घ्यावे.

बातमी शेअर करा
Previous Post

भाऊ निघाला सख्खा वैरी : महिलेचा खून करून गोणपाटमध्ये भरून नाल्यात फेकला, पोलिसांनी खुन्याला केली अटक

Next Post

राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण चुकीचे नवीन करण्याची सकल जैन समाजाची मागणी

Next Post
राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण चुकीचे नवीन करण्याची सकल जैन समाजाची मागणी

राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण चुकीचे नवीन करण्याची सकल जैन समाजाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add