नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिवसैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहेत. विरोधकांना रोखायचे असेल तर भक्कम कार्यकर्ते घडविणे गरजेचे आहे.सेना भवनातून १६ निरीक्षक जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान निमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तालुकास्तरावर शिवसैनिकांचे मेळावे घेण्यात येतील अशी माहिती शिवसेनेचे धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केले येईल.
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या आयोजनासाठी झराळी ता.नंदुरबार येथील बी.के फार्म हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अभियानाची माहिती देतांना त्यांनी सांगितले,
२६ मे पासून जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याने त्यासाठी सेना भवनातून १६ नियुक्त केलेले निरीक्षक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. निरीक्षक प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय गावागावात जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे.
थोरात पुढे म्हणाले, पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करा. प्रत्येक गावात २५ कार्यकर्त्यांची टीम गठीत करा. त्यात शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या व शिवसेना संलग्नित पदाधिकाऱ्यांच्या समावेश करा. शिवसैनिकांची फळी तयार झाल्यास कुठल्याही निवडणुका लढवण्यासाठी सोपे जाईल. बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे यांनी केले.
अभियानांतर्गत कार्यकर्त्यांचे मेळावे
शिवसंपर्क अभियानांतर्गत जिल्हाभरात कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. विधानसभा मतदार संघ निहाय प्रत्येक गटागटात जाऊन शिवसेनेचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यात येतील. गाव तिथं शिवसेनेची शाखा उघडण्यात येईल. संपूर्ण जिल्हा भगवामय करून शिवसंपर्क अभियान यशस्वी करु
चंद्रकांत रघुवंशी,माजी आमदार
नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार
यावेळी शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख आमाश्या पाडवी,जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी,जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी,कृषी सभापती गणेश पराडके,जि.प सदस्य विजय पराडके, धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रीना पाडवी,युवती सेनेच्या मालती वळवी उपस्थित होत्या.
या ठिकाणी आहेत मेळावे
२७ मे धडगाव, २८ मे शहादा, २९ मे नंदुरबार,३० मे नवापूर