नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नंदुरबार जिल्हा निरीक्षकपदी मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे नियुक्ती पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली असून विनय भोईटे हे येत्या चार दिवसात नंदुरबार जिल्हा दोऱ्यावर येणार आहेत अशी माहिती मनसे जिल्हा सचिव मनलेश जायस्वाल यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांची नंदुरबार जिल्हा निरीक्षकपदी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली असून त्याच सोबत त्यांना सहाय्यक म्हणून कीर्तीकुमार शिंदे व आदित्य चोपडे यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील मागील काही वर्षात मनसे पक्ष संघटन हे विस्कळीत झाले होते या करणा मुळे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी दाखल घेत पक्ष संघटन वाढावे व पक्ष ध्येय-धोरणे सामान्य जनते पर्यंत पोहचावे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध समस्या शासन दरबारी मांडता यावी तसेच पक्ष संघटने मार्फत सुटावे व अन्याय –अत्याचार विरोधात आवाज अधिक बुलन्द करता यावा या साठी विनय भोईटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .त्यांच्या निवडी मुळे जिल्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यात नवचैतन्य निर्माण होणार आहे.या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे .