नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील पांघराण येथून शेततळ्यासाठी असलेला सुमारे ५५ हजार रुपये किंमतीचा प्लास्टीक कागद चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील पांघराण येथील कस्तीज जेरमा गावित यांच्या घरासमोरील अंगणात ठेवलेला ५२ हजार ५०० रुपये किंमतीचा शेततळ्यासाठी असलेला प्लास्टीक कागद चोरट्याने चोरुन नेला.
याबाबत कस्तीज गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.