नंदुरबार | प्रतिनिधी-
जिल्हा परिषदेच्या चितवी गटाच्या पोटनिवडणुकीसाठी आज दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात एक कॉंग्रेस व एक अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.
नवापूर तालुक्यातील चितवी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. दि.१७ ते २३ मे पर्यत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे.
आज पाचव्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कॉंग्रेस पक्षातर्फे वडसत्रा येथील विशाल रमेश गावित यांनी तर अपक्ष म्हणून सोमू रावजी गावित यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.