Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी नामफलक लावणे अनिवार्य

team by team
May 20, 2022
in राष्ट्रीय
0
जिल्ह्यात सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी नामफलक लावणे अनिवार्य

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करण्यासाठी नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे.

या अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे, असे सरकारी कामगार अधिकारी अ.ज.रुईकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील सर्व व्यावसायिक दुकाने व आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेत असण्याकरीता शासनाने अधिसुचना प्रसिध्द केलेली आहे.

यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापनांना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम,2017 च्या कलम 36 क-1 कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकाने व आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागु आहे.

त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक असणार आहे. तसेच अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक लावता येणार आहे.

याबरोबरच मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही.

त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाहीत,

अशी तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे. या अधिसुचनेची जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी काटेकोरपणे अंमबजावणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ.ज. रुईकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दसवड येथे पाणी पुरवठा योजनेचे खा. हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

खापरच्या इरा इंटरनेशनल शाळेतील विद्यार्थी लिडच्या राष्ट्रीय सुपर १०० परीक्षेत पात्र, लाखो विद्यार्थ्यांमध्ये सुरज पवार याने मिळवली जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add