नंदुरबार l प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर , जि . नाशिक येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व श्री.गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांची बेकायदेशीररित्या बदनामी केल्याबाबत तसेच सेवेकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखवल्या बद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री स्वामी समर्थ सेवेकरींच्या वतीने करण्यात आली आहे .
या बाबत आज जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले .यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख जीवन तानका देवरे ,भाजपाचे जिल्हाद्यक्ष विजय चौधरी, प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे,शहादा केंद्राचे प्रमुख सौ.नंदाताई गिरासे,धडगांव चे प्रमुख अलकाताई पाडवी , ॲड सुशिल गवळी व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, श्री. स्वामी समर्थ मार्गाचे काम हे श्री परमपुज्य मोरे व प.पु.गुरूमाऊली सुमारे ७४ वर्षापासून अविरहीतरित्या करत आहे .
सदरील कामकाज हे अत्यंत पारदर्शकपणाने चालते . सदरील न्यास हा कायदेशीररित्या त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असून त्याचे कामकाज हे कायदेशीररित्या पारदर्शकपणे लोकाभिमुखपणे चालविले जाते .
सदरील संस्थेचे सामाजिक , अध्यात्मिक , धार्मिक स्तरावर लोकहिताची कामे केली जातात . तसेच श्री स्वामी समर्थ मार्गाचे शेती विषयक जनजागरण व मार्गदर्शनही केले जाते त्यासाठी प.पु.गुरूमाऊली हे भारतभर नव्हे तर जगभर लोक प्रबोधनासाठी मेळावे घेत असतात .
श्री स्वामी समर्थ मार्गासाठी लाखो सेवेकरी जोडलेले असून सदरील सेवा मार्गास आदरणिय प.पु. गुरूमाऊली यांनी व्यापक स्वरूप देवून देशात व विदेशात शेकडो सेवा केंद्र उभारलेली आहेत.
या सेवा केंद्रांमध्ये बाल संस्कार , युवा प्रबोधन , स्वयं रोजगार , विना हुंडा सामुहिक विवाह , प्रश्नोत्तर सेवा , व्यसन मुक्ती , शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव व शेतकरी सत्संग मेळावे , दुष्काळात गुरांना चारा , पाण्याच्या टाक्यांचे वाटप , व गरजू आदिवासींना कपडे , धान्य वाटप ,
आरोग्य शिबीर माध्यमातून मानव रोगमुक्त करणे , प्रबोधनाकरीता ग्रंथ निर्मिती , गोधन संरक्षणाकरीता गो शाळा , वेद विज्ञान संशोधनाद्वारे संस्कृतीचे जतन या लोक कल्याणकारी योजनांचा कोट्यावधी भाविक सेवेकरी लाभ घेत आहेत .
तसेच श्री स्वामी समर्थ मार्गाने कोविड काळात लाखो गरजूंना अन्नदान तसेच महाराष्ट्र शासनास सेवेकरी निवास कॉरन्टाईन सेंटर करीता निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले .
अशा प्रकारे शासनासही मदत करण्याच्या व शासनाच्या काम करण्याच्या जबाबदाच्या पार पाडण्याचे काम स्वामी मार्गा मार्फत केले जाते .
सदरील श्री स्वामी समर्थ परिवार सामाजिक , अध्यात्मिक , धार्मिक स्तरावर लोक हिताचे काम करत आहे व सदरील मार्गाचे काम हे अखंड अविरहितपणे चालु असतांना अमर रघुनाथ पाटील , शिवाजी नगर , पुणे , व चंद्रकांत गणपत पाठक यांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर बाबींचा विचार न करता बेकायदेशीरित्या वैयक्तिक स्वार्थापोटी खोटे – नाटे अर्ज करून श्री स्वामी समर्थ गुरुपीठात ५० कोटीचा अपहार झाल्याबाबत तसेच आदिवासींच्या जमीनींबाबत व बांधकामाबाबत जे बेकायदेशीर वक्तव्ये केलेली आहेत ,
त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही .सदर आरोप हे बिनबुडाचे आहेत. या वक्तव्यांमुळे श्री स्वामी समर्थ परिवारामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असून भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्यामुळे सर्व सेवेकाऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले प.पु. गुरूमाऊली व सेवामार्गाची बदनामी करून चुकीचा संदेश समाजात परसरवण्याचे चुकीचे कृत्य करण्यात आले आहे
.गुरुपीठाची बदनामी करणारे तसेच सोशल मीडिया चा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर फोजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.