Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात प्लास्टीकच्या पिशवी विक्रेत्यांवर नगरपालीका करणार कारवाई

team by team
May 19, 2022
in क्राईम
0
जिल्ह्यात प्लास्टीकच्या पिशवी विक्रेत्यांवर नगरपालीका करणार कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी
प्लास्टीक निर्मुलनासाठी सर्व स्तरातून व्यापक जनजागृती करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृतीदलाच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता स्वप्निल पाटील, सहायक अभियंता जितेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.

श्री.खांदे म्हणाले की, प्लास्टीकच्या अतिवापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असुन प्लास्टीकच्या अविघटनशील कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात नैसर्गिक अधिवास, पर्यावरण तसेच सागरी जीव, वन्य जीव व मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

यासाठी प्लास्टीक निर्मुलनासाठी सर्व नागरिकांनी प्लास्टीक पिशवीचा वापर करणे टाळावे. नागरिकांनी भाजीपाला व इतर सामान घेण्यासाठी कापडी पिशव्याचा वापर करावा. यासाठी शैक्षणिक संस्था, एनसीसी, एनएसस, स्काऊट, युवा संघटना, इको क्लब, तसेच स्वंयसेवी संस्थांनी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी.

प्लास्टीक कचरा व्यवस्थापन नियम 2021 च्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधीसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधीचा वापर करावा. प्लास्टीकच्या बदल्यात बांबू, कापडी पिशवीचा वापर करावा. पर्यावरणपूरक पिशव्या निर्मितीसाठी बचतगट तसेच त्याउत्पादन करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहन करावेत.

बंदी घातलेल्या एकल वापर प्लास्टीकच्या पिशव्यासंदर्भात किराणा, दुकानदार, व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. तसेच बंदी घातलेल्या प्लास्टीकच्या पिशवी विक्रेत्यांवर नगरपालीकेने कठोर कारवाई करावी. प्लेवर ब्लॉक तसेच रस्ता निर्मितीसाठी विघटन करणाऱ्या प्लास्टीकचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. बैठकीस सर्व मुख्याधिकारी आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या अंगावरून ट्राला गेल्याने तिचा जागीच मृत्यू

Next Post

श्री. स्वामी समर्थ गुरुपीठात ५० कोटीचा अपहाराचे बेकायदेशीर वक्तव्ये करून बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा ,स्वामी सेवेकरींची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add