Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीजबिलातील व्याज व दंड माफीसह पुनर्जोडणीची संधी, 418 ग्राहकांनी घेतला लाभ

team by team
May 19, 2022
in राज्य
0
वीजबिलातील व्याज व दंड माफीसह पुनर्जोडणीची संधी, 418 ग्राहकांनी घेतला लाभ

नंदूरबार l प्रतिनिधी

महावितरणने विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांसाठी व्याज व विलंब आकारात 100 टक्के माफीची सोय करून पुनर्जोडणीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

वीजबिलाच्या थकबाकीपोटी 31 डिसेंबर 2021 पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित असलेल्या सर्व ग्राहकांसाठी (कृषी ग्राहक वगळून) ही योजना लागू आहे. सर्व पात्र ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे. जळगाव परिमंडलात आतापर्यंत 418 ग्राहकांनी या योजनेत भाग घेऊन 18 लाख रुपयांची सवलत ळिवली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांना मुख्य प्रवाहात आणून अर्थचक्राला गती देण्याचे हेतूने विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा केलेली आहे.

कोविड-19 चा प्रादुर्भाव व टाळेबंदी कालावधी यांचा परिणाम अर्थचक्रावर होऊन ग्राहकांच्या वीजबिलांच्या थकबाकीत वाढ झाल्याने अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला होता. त्यांना थकबाकी भरण्यात दिलासा देण्यासाठी ही योजना आणली आहे.

1 मार्चला सुरू झालेल्या या योजनेची मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. ग्राहकांना मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यावरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात येईल.

ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के व लघुदाब ग्राहकांना 10 टक्के थकीत मूळ रकमेत अधिकची सवलत मिळेल. ग्राहकांना सुलभ हप्त्याने थकीत रक्कम भरावयाची असल्यास मूळ थकबाकीच्या 30 टक्के रक्कम एकरकमी भरणे आवश्यक आहे.

उर्वरित रक्कम 6 हप्त्यात भरता येईल. योजनेत सहभागी ग्राहकांना पुनर्जोडणीसाठी शुल्क व अनामत रक्कम भरणा करावी लागेल. वीजजोडणी पूर्ववत झाल्यानंतर चालू वीजबिल व मूळ थकबाकीच्या हप्त्यांची रक्कम नियमित भरणे अनिवार्य आहे.

महावितरणने थकबाकी वसुलीसाठी न्यायालयात दावा दाखल केला असल्यास संबंधित ग्राहकांस या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च) देणे आवश्यक राहिल.

महावितरणच्या बाजूने न्यायालयाने आदेश दिलेल्या प्रकरणास 12 वर्षाहून अधिक कालावधी झाला नसेल व लाभार्थी ग्राहकाने अपिल दाखल केले नसेल तर अशा ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

न्यायालयात वाद चालू वा प्रलंबित असलेल्या प्रकरणातील ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. इच्छुक ग्राहकांनी अधिक माहितीसाठी नजिकच्या महावितरण कार्यालयास वा संकेतस्थळाला भेट द्यावी.

जळगाव परिमंडलातील 3 लाख 1 हजार 783 कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित वीजग्राहकांकडे एकूण 319 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात 255 कोटी 89 लाख रुपयांची मूळ थकबाकी भरल्यास ग्राहकांना या योजनेत विलंब आकार व व्याजाची सुमारे 63 कोटी 75 लाख रुपये माफी मिळणार आहे.

गेल्या अडीच महिन्यांत जळगाव परिमंडलात 418 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांनी 1 कोटी 90 लाख 78 हजार रुपयांची मूळ थकबाकी भरल्याने त्यांना विलंब आकार व व्याजाची 18 लाख 16 हजार रुपयांची रक्कम माफ करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

उभ्या दुचाकीला दुचाकीची धडक, महिला जखमी

Next Post

शहादा येथून पुन्हा दुचाकी लंपास

Next Post
नंदुरबार व शहादा येथून मोटरसायकल लंपास

शहादा येथून पुन्हा दुचाकी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add