नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पिंगाणे शेत शिवारातून चोरट्याने ठिबक नळी व पाईप लंपास केल्याची घटना घडली.पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत याप्रकरणी एकास अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील युवराज राजाराम पाटील यांचे गट सर्व क्र.१७/१ येथे शेत आहे. सदर शेतात असलेली ठिबक नळ्या व पीव्हीसी पाईप चोरट्याने चोरुन नेले.
याबाबत युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दीपक परदेशी करीत आहेत.
दरम्यान शेतकऱ्यांची बाब असल्याकारणाने पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे गतिमान केली यात आरोपी रियाज भिकन पिंजारी (रा. भाजीपीर दर्ग्याजवळ, कुकडेल शहादा)यास अटक करण्यात आली असून पोलिस तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.