नंदुरबार l प्रतिनिधी
चित्रकथी समाजाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी सर्वानुमते गठित करण्यात आली असून नंदूरबार तालुक्यातील चोपाळा येथे चित्रकथी समाजाची जिल्हा कार्यकारणीची सभा संपन्न झाली.
या वेळी चित्रकथी समाज नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी राजू धर्मा शिंदे पांतोडा ता.नंदुरबार तर उपाध्यक्षपदी राजेंद्र फकिरा जाधव मलोनी ता.शहादा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर बैठक ही जिल्हाच्या ठिकाण असलेल्या चौपाळे येथील श्री. रामदेवबाबा मंदिर येथे खेळी मेळीच्या वातावरनात घेण्यात आली.या वेळी रामदेवबाबा व खंडेराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठक आरंभ झाली.
यावेळी हजारोच्या संख्येने चित्रकथी समाजबांधव या ठिकाणी उपस्थित असून यावेळी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व एकता अशा विविध महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा करुन पुढील नियोजन करण्यात आले.
तसेच नवनियुक्त कार्यकारिणी पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली आहे. जिल्हा सचिव पदी मक्कन संसारे,कार्याध्यक्ष सोमा शिंदे, पानसेमाल ता.अध्यक्ष पदी सुरेश धोंडू शिंदे,उपाध्यक्षपदी पंडित इंगळे,संघटक किसन वायखर,
उपसंघटक संतोष अटक,सचिव कांतीलाल इंगळे,उपसचिव राजू अटक,सल्लागार ओंकार जाधव, तसेच कुकरमुंडा ता.अध्यक्ष किशोर अशोक भोजने,उप.ता.अध्यक्ष गणेश अटक,तसेच सुरत संघटक प्रमुख पदी सुनील वायखर यांची नियुक्ती करण्यात आली.