नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडगांव- मोलगी रस्त्यावर असलेल्या सुरवाणी गावाजवळ परराज्य निर्मिती व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित विदेशी मद्य , बिअर व चारचाकी वाहनासह सुमारे ५ लाख ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार येथील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने परराज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य व बिअरची वाहतुक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाल्यावर सापळा लावला त्यानुसार धडगांव- मोलगी रस्त्यावर असलेल्या सुरवाणी गावाजवळ एक संशयीत वाहन भरधाव वेगाने येत असताना दिसून आल्यावर त्याचा पाठलाग करत त्याला थांबवुन त्याची तपासणी केली असता विदेशी मद्याचे बाक्स दिसुन आले .वाहनांसोबत असलेल्या इसमांकडे चौकशी केली असता गोवा व मध्येप्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्य व विअर घटनास्थळी मिळुन आले . त्यासोबत महिन्द्रा कंपनीची बोलेरे चारचाकी वाहनासह एकुण २ आरोपीत इसमांना अटक केली . सदर गुन्ह्यात महिन्द्रा कंपनीची बोलेरे एकुण रू . ५ लाख ७८ हजाराचा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कार्यवाही करण्यासाठी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप , राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संचालक श्रीमती उषा वर्मा , विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ ,नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शन लाभले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक जी.जी. अहिरराव , राजेन्द्र पावरा , धनराज पाटील , मानसिंग पाडवी यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जी.जी.अहिरराव दुय्यम निरीक्षक जी जी अहिरराव नंदुरबार हे करीत आहे.