नंदुरबार l प्रतिनिधी
समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेतंर्गत सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अद्यापही ज्यांचे अर्ज महाविद्यालय व विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित आहे. अशा महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी त्वरीत अर्ज सादर करावे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील सुमारे 463 अर्ज हे विद्यार्थी व महाविद्यालयाच्या स्तरावर प्रलंबित असून 212 विद्यार्थींनी अद्याप महाविद्यालयाकडे अर्ज सादर केलेले नाही. तसेच 251 अर्ज महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे वर्ग केले नाही. त्यामुळे हे अर्ज प्रलंबित राहिल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालय व विद्यार्थ्यांची असेल असे सहायक आयुक्त, समाज कल्याण,नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.