म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वैजाली येथील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त संपूर्ण गावातून मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील महिला पुरु आबालवृद्ध तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वैजाली येथील प्रभू श्रीराम मंदिरात गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे मूर्ती प्राणप्रतिष्ठाचे काम रखडलेले होते मात्र ग्रामस्थ मंडळी व शहादा येथील जाधव बंधू ज्वेलर्सचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक श्याम भाऊ जाधव यांच्या प्रयत्नाने नुकतेच श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा बाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी दि.17 मे रोजी संपूर्ण गावातून प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मणजी, हनुमानजी यांच्या मूर्तींचे गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील कळसधारी बालिका मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होत्या यावेळी आदर्श चौक श्री. राम मंदिर, श्री.स्वामी समर्थ मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव मंदिर, मारुती मंदिर, संतोषी माता मंदिर, वाडा गल्ली,चव्हाण गल्ली, नवागाव, इंदिरानगर, भीम नगर, देव मोगरा माता नगर आदी भागातून मूर्तींची मिरवणूक काढण्यात येऊन श्रीराम मंदिरात सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत गावातील महिला पुरुष आबालवृद्ध तरुण मित्रमंडळी युती आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला व एकतेचे दर्शन घडविले दि. 18, 19 मे रोजी होम हवन विधी पूजा साठी 11 विवाहित जोडप्यांचे आयोजन करण्यात आले असून मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आचारी राजेंद्र महाराज कुलकर्णी तसेच तूप आचारी हर्षल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि. 20 मे रोजी कलश पूजन तसेच धार्मिक विधी व मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तरी गाव परिसरातील भाविक भक्त नागरिक यांनी कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा असे आवाहन वैजाली चे माजी सरपंच विनोद पाटील, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंकज पाटील, श्रीराम पाटील, कल्पेश पाटील, छोटू पाटील, भीमराव पाटील तसेच तसेच श्रीराम मंदिर निर्माण समिती ग्रामस्थ यांनी केले आहे.