तळोदा l प्रतिनिधी
बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणनेसाठी तळोदा वनविभागाकडून वाल्हेरी, अलवाण, तुळाजा, बन या चार ठिकाणी बनविण्यात आलेल्या मचानीवरून बिबट्या अस्वल दिसलें. तर काही ठिकाणी मचानिवर घुबड, बिबट्याची डरकाडी ऐकण्यासाठी मिळाली, काही ठिकाणी वन कर्मचाऱ्यांनी अस्वल तरस या वन्य प्राण्यांची विष्ठा व पंजे दिसून आल्याची माहिती वनशेत्रपाल निलेश रोडे यांनी दिली.
जंगलातील प्राण्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बुद्ध पौर्णिमेला सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे पावेतो ही प्राणी गणना झाली. तळोदा वनविभागाकडून वाल्हेरी, अलवाण, तुळाजा, बन या चार ठिकाणी मचाण बनविण्यात आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्याच्या नोंदी घेण्यासाठी झालेल्या प्राणी गणनेत रात्रीच्या सुमारास वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी आले होते. सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ या वेळेत गणना करण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी प्राण्यांचे ठसे आणि विष्ठेचे पुरावे गोळा केले. याशिवाय वाल्हेरी येथे बनविण्यात आलेल्या मचाणीवर घुबडचा आवाज ऐकायला आला आहे. मालदा येथे बिबट्या व अस्वल दिसलें असून तरसचे देखील पायाचे ठसे घेण्यात आले असल्याची माहिती वनशेत्रपाल निलेश रोडे यांनी दिली. वाल्हेरी, अलवाण, तुळाजा, बन याठिकाणी तयार करण्यात आलेल्या माचाणीवरून निरीक्षणाचा कार्यक्रम पार पडला. सहाय्यक वनसंरक्षक जी.पी.गांगुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र पाल तळोदा निलेश रोडे, बोरद वनपाल श्रीमती ए.बी. लोहार, राजविहिर वनपाल व्ही.एस.माळी, राणीपुर वनपाल एन.पी.पाटील, बन वनरक्षक जे.आर. खोपे, सोमावल वनरक्षक आर.जे. शिरसाठ, तुळाजा वनरक्षक एम.ओ. नाईक, मालदा वनरक्षक आर.एम. पावरा, धनपुर वनरक्षक व्ही.जे. पावरा, सरक्षक तपासणी पथकाचे सी.सी पाडवी खर्डीचे वनरक्षक जे.पी पावरा वनमजुर व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती मचानावर पहारा दिला.