नंदुरबार ! प्रतिनिधी
धनाजी खुर्द ता.अक्राणी, जिल्हा नंदुरबार येथे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला याची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी होती.
आज दि. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी भारतीय वेळेनुसार 4:45 वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील धनाजी खुर्द येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसले.याचे परीघ क्षेत्र 55 किलो मिटर होता. याबाबतची माहिती भूकंपशास्त्रीय संशोधन केंद्र गांधीनगर यांनी दिली.यावेळी कुठलीही जिवीत व आर्थिक हानी झाली नाही.