म्हसावद l प्रतिनिधी
प्रकाशा येथील विकास इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता मात्र दिवाळीनंतर शाळा उघडली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले गेले. त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला.
प्रकाशा येथील विकास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला. या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंग्लिश मीडियम स्कूल चे समन्वयक एस.पी. बेलदार, प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र गुरव, ज्येष्ठ पालक ज्ञानदेव पाटील, प्राचार्य हरिहर गिरासे व विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांनी विद्येची देवता सरस्वतीचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत सर्वांगीण विकासासाठी जी उपक्रम राबवले गेले त्यात टाकाऊ पासून टिकाऊ, चित्रकला, निबंध, रनिंग स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, मातीचा गणपती बनवणे, असे विविध उपक्रम राबवले गेले.तसेच या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र मेडल देऊन गौरवण्यात आले.
या वेळी अध्यक्ष यस.पी.बेलदार यांनी सांगितले की, इंग्लिश मीडियम स्कूलचा चेअरमन प्रितीताई पाटील यांचा मार्गदर्शनानुसार शाळेचे कामकाज सुरु आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार, इंग्लिश शिक्षण मिळावे यासाठी या शाळेची निर्मिती झाली आहे. नवीन इमारत बनून तयार आहे.पुढच्या शैक्षणिक वर्षांमध्ये नवीन इमारतीत यात शंका नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. पुस्तकी ज्ञान सोबतच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कला-क्रीडा हे देखील महत्वाचे आहे. असे ते म्हणाले. व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. मनोगत नरेंद्र गुरव, हरिहर गिरासे, आदींनी केले.या सर्व उपक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका भाविका पटेल, निकिता वाणी, हर्षदा पाटील, स्वाती साळुंके आदींनी प्रयत्न केले.