नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथे दि. 8 ऑगस्ट 2021 रोजी काँग्रेस प्रदेकाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती परंतु नानाभाऊ पटोले यांचा दौरा रद्द झाल्यामुळे सदरची बैठक रद्द करण्यात आलेली आहे .
आता ही बैठक पालकमंत्री ॲड.के सी पाडवी व महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचा दौरा निश्चित झालेला आहे. या कार्यक्रमांमध्ये वेळेत बदल करण्यात आलेला आहे .दि.८ ऑगस्ट 2021 रोजी हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या स्मारकाला दोघेही मंत्री महोदय सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी भेट देणार आहे. मात्र तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बैठक रद्द करण्यात आली आहे.हुतात्मा स्मारक येथील कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी ,पंचायत समितीचे काँग्रेस पक्षाचे सभापती आणि सदस्य ,तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनीच फक्त हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या स्मारका वरील कार्यक्रमास सकाळी 8.30 वाजेला न चुकता उपस्थित राहण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी केले आहे.